Viral Video : देशात महिलांच्या सन्मानासाठी आणि हक्कांबाबत अनेक कायदे करण्यात आले आहेत. पण यानंतरही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. आजही महिलांवरचे हल्ले, विनयभंग (Molestation) या घटनांमध्ये घट झालेली नाही. असाच एक धक्कादायक  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा तरुणाने विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बंगळुरुमध्ये घडली असून बंगळुरुसारखं (Bangalore) शहरही महिलांसाठी सुरक्षित नाही का? असा प्रश्न विचारला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओ?
धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना बंगळुरुमधली आहे. या घटनेचा व्हिडिओ Vani Mehrotra नावाच्या अकाऊंटवर सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. यासोबत एक पोस्टही लिहिण्यात आली आहे. यात तीने म्हटलंय 'बंगळुरुत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेसोबत छेडछाड. घटनास्थळावरुन आरोपी फरार, आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत' 


व्हायरल होणारा हा व्हिडिओ 2 ऑगस्टचा असून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे एक महिला मॉर्निंग वॉक करत होती. रस्ता निर्मनुष्य होता, याचा फायदा घेत एक तरुण महिलेचा पाठलाग करत तिच्या जवळ येतो आणि  तिला दोन्ही हाताने पकडून तिचा विनयभंग करताना दिसतोय. अचानक घडलेल्या या घटनेने महिला घाबरते, पण लगेच सावरत ती विरोध करायला सुरुवात करते, त्याचवेळी ती आरडाओरडा करताना दिसत आहे. महिलेने आरडाओरडा सुरु करताच आरोपी तरुण पळून जातो. 



व्हिडिओ पाहून लोकांचा संताप
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी तरुणाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. बंगळुरु सारख्या प्रगत शहरातही महिला सुरक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया काही युजर्सने दिल्या आहेत.