मुंबई : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ इतकं मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ पाहून अंगावर कांटा उभा राहतो. काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अचानक समोर हत्ती येतो. स्कूटीवरुन जाणाऱ्या महिलेचा अचानक तोल जातो. पण ती सुदैवाने बचावते. (After seeing elephant women lost his control on scooty )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी घेऊन जाताना अचानक समोरुन काही आले तर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वाहने चालवताना अधिक गतीने चालवणं टाळलं पाहिजे. कार आणि स्कूटी चालवताना नियमांचे पालन केले पाहिजे. अशा परिस्थितीत कोणता प्राणी किंवा वस्तू कधी समोर येईल हे कोणालाच माहित नसते. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईल. एक महिला हत्तीच्या पायाखाली येता-येता थोडक्यात बचावली.



व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये समोरून एक हत्ती जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका महिलेने समोरून वेगाने स्कूटी घेऊन येते. त्या महाकाय प्राण्याला पाहून तिचा तोल गेला. ते पाहून हत्तीही घाबरतो आणि बाजूला वळतो. यात ती महिला थोडक्यात बचावते.


हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केलाय. 50 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.