Bride Groom Video : लग्न मंडपातच नवरदेवाची दादागिरी, माहेरी गेली तर...
Viral Video : सध्या लग्नसराईचे (marriage) दिवस आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कपलचे (couple Video) अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. मजेदार, रोमँटिक आणि प्री-वेडिंग फोटोशूट असं अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात.
Bride Groom Viral Video : लग्न म्हटलं की प्रेम (Love), सहवास, नातं आणि जबाबदारी...एकमेकांच्या भावनांचा आदर...ज्या घरात लहानचं मोठं व्हायचं...ज्या आई वडिलांच्या (mother father Video) खांद्यावर खेळाचं त्यांना सोडून एक दिवस लग्न (marriage Video) केल्यावर निघून जायचं. ते घर एका क्षणात आपल्यासाठी परकं होतं. लग्न झाल्यावर सासर म्हणजे आपलं घर..पण या हक्काच्या घरी म्हणजे माहेरी जाण्यासाठी सासरे सासू (mother in law) आणि नवऱ्याकडे परवानगी मागायची...आणि जर त्यांनी नाही म्हटलं तर...सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात नवदेवाने लग्न मंडपातच नवरीवर दादागिरी केली आहे.
माहेरी गेली तर...
सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. नवदेवाचं (Groom) हे रोमँटिक (Romantic) होणं, अचानक नवरदेव आणि नवरीचं (Bride) किस (kiss) करणे असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण या नवरदेवाने तर चक्क हद्दच केली. लग्न मंडपात वऱ्हाडीसमोर नवदेवाने माहेरी जाण्यावरुन नवरीला धमकी दिली. (virel Bride Groom wedding fun Video on social media nmp)
हेही वाचा - Video : अरे कोणी यांना सांगा, ही स्पर्धा नाही; कपलचं नॉनस्टॉप Kissing पाहून पब्लिक हैराण
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media)
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,मंडपात लग्नाचे विधी सुरु आहेत, पंडितजी नववधूला लग्नानंतर काय करायचे याबद्दल सांगत असतात. नववधूने तिच्या माहेरी जाण्यासाठी नवरा किंवा सासूची परवानगी घ्यावी, असं पंडीत सांगतो. मग काय नवरदेवाने संधीचा फायदा घेत नवरीला म्हटलं की, मी तुला माहेरी जाण्याची परवानगी देईन, पण एका अटीवर की, तू किमान एक महिना तरी सासरी येऊ नकोस. यानंतर नवरीच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. पण नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललं.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातं आहे. या व्हिडीओवर यूजर्स वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत. सोशल मीडियावर वधू-वरांचे अनेक व्हिडीओ (Bride groom video) पाहिला मिळतात.