प्रेमाला वयाची मर्यादा नसते असं म्हणतात. पण ते योग्य वेळी आणि योग्य व्यक्ती सोबत व्हावं हे त्याच्यासोबतच त्याच्या जवळच्या व्यक्तींनाही वाटतं. पण काही पालक हे त्यांच्या मुलांबाबत इतके असुरक्षित असतात की सतत ते त्यांची सातत्याने काळजी करत असतात. एका बापाची हीच काळजी त्याच्या मुलीच्या जीवावर उठली आहे. आंध्र प्रदेशातील ((Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मुलीची प्रेमात (affair) पडल्यामुळे हत्या केलीय. यानंतर आरोपी पित्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि गुन्ह्याची कबुली दिली. (Visakhapatnam father killed her daughter fell in love)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रेलवेधी येथे राहणाऱ्या वारा प्रसादने (Vara Prasad) प्रेमात असलेल्या मुलीची हत्या केलीय. वारा प्रसाद हे रुग्णवाहिका (ambulance) चालवतात. मुलीला संपवल्यानंतर वारा प्रसादने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ पोस्ट केला आणि घडलेला प्रसंग सांगितले. मी माच्या 16 वर्षांच्या मुलीची हत्या केली, कारण तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध (Love affair) होते, असे वारा प्रसादने सांगितले. हा सेल्फी व्हिडीओ (Selfe Video) समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीची चौकशीही सुरु केली आहे.


तिने जे काही मागितले ते दिले पण...


"माझ्या मुलीचे घराजवळ राहणाऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. माझी मोठी मुलगी आधीच तिच्या प्रियकरासह पळून गेली आहे. आता माझ्या दहावीत शिकणाऱ्या लहान मुलीचेही अफेअर चालू होते. तिने जे काही मागितले ते मी तिला दिले आहे. मी तिला खूप प्रेमाने वाढवले आहे. मी माझ्या मुलीला त्या मुलासोबत बोलू नकोस असे सांगितले, पण तिने ऐकले नाही. म्हणून मी तिला मारले," असे वारा प्रसादने या व्हिडीओमध्ये सांगितले.


पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला हा खून असल्याचा संशय होता, परंतु मृताच्या मानेवर खुणा दिसल्यानंतर संशयास्पद मृत्यूची नोंद केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.