मुंबई : विमानप्रवासाची मोठी डोकेदुखी म्हणजे प्रवासाआधी काही तास विमानतळावर पोहचणं. परंतू ट्राफिकची वाढलेली समस्या लक्षात घेता कितीही लवकर निघण्याचा प्रयत्न केला तरीही अनेकदा वेळेत पोहचता येत नाही. यामुळे विमान चुकण्याची शक्यता असते. पण आता दिल्लि विमानतळावरून तुमचं विमान चुकल्यास विस्तारा एअरलाईन्स तुम्हांला मदत करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरून तुमचं विमान चुकल्यास विस्तारा एअरलाईन्स तुम्हांला पुढील विमानाच्या फ्लाईटमध्ये सीट उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे. 


विस्तारा एअरलाईन्सने ट्विटरवर या नव्या अपडेटची माहिती दिलेली आहे. तसेच याकरिता एअरलाईन्स कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही.