मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये सुट्ट्यांचा काळ सुरू होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा दिवाळीला जोडूनच शनिवार राविवार आल्याने अनेकजण लॉंग़ विकेंडची मज्जा घेत एखादी शॉर्ट ट्रीप प्लॅन करू शकतात. 
रेल्वेचं बुकिंग चार महिने आधीच  हाऊलफुल्ल झालयं मग आता साधारण त्याच दरात देशात विमानप्रवास करायची संधी विस्तारा या विमानकंपनीने दिली आहे. 


विस्ताराने आज 'फेस्टिवल ऑफ फ्लाईट्स' ही बंपर ऑफर आणली आहे. या ऑफरदरम्यान ११ ऑक्टोबर रात्री 12.01 वाजल्यापासून 12 ऑक्टोबर 11.59 पर्यंत तिकीट बुकिंगसुरू राहणार आहे. तसेच या ऑफरदरम्यान प्रवाशांना  28 ऑक्टोबर 2017 ते  24 मार्च 2018 दरम्यानची तिकीटं बुक करण्याची सोय दिली आहे. 


गोवा, पोर्ट ब्लेअर, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवाहाटी, अमृतसर, भुवनेश्वर सह मुंबई, दिल्ली आणि कोलकत्तासारख्या मेट्रो शहरांमधीलही तिकीट बुकिंग होणार आहे. 


श्रीनगर,जम्मू या शहरातील तिकीटं स्वस्त आहेत. या ऑफर दरम्यान  इकोनॉमी क्लास चे सगळ्यात स्वस्त तिकीट 1149 रुपये आहे तर  प्रीमियम इकोनॉमी क्लास चे तिकीट  2,099 रुपये आहे. या किंमतीवर इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. तसेच देशभरात सुमारे २२  शहरांसाठी ही ऑफर खुली असल्याने अनेकांना आपली ट्रीप प्लॅन करण्याची संधी मिळणार आहे.