मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेली दुरसंचार क्षेत्रातील खासगी कंपनी वोडाफोन आयडीयाला 30 जून 2021 च्या समाप्तीनंतर चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 7 हजार 319 कोटीचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा तोटा 25 हजार कोटींचा होता.(Vodafone Idea Q1 Results)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोन आयडीयाच्या पहिल्या तिमाही दरम्यान कंपनीचे एकीकृत परिचलन उत्पन्न साधारण 14 टक्क्यांनी कमी होऊन 9 हजार कोटी रुपये राहिले आहे. एक वर्षा आधी पहिल्या तिमाहीत हे 10 हजार कोटी रुपये इतके होते.


कंपनीवर इतके कर्ज
पहिल्या तिमाहीच्या समाप्तीपर्यंत Vodafone Idea चे एकूण कर्ज 1 लाख 91 कोटी इतके होते. यामध्ये 1 लाख 6 हजार कोटी स्पेक्ट्रमचे पेमेंट आणि 62 हजार कोटींचे AGR थकबाकी आहे.


या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या समाप्तीपर्यंत  वोडाफोन आयडीयाजवळ रोख आणि समतुल्य रक्कम 920 कोटी रुपये होती.  यानुसार कंपनीवर 1 लाख 90 कोटींचे कर्ज होते.


कंपनीचे एमडी आणि सीईओ रविंदर टक्कर यांनी म्हटले आहे की, आम्ही आपल्या नियोजनाच्या अंमलबाजवणीवर लक्ष केंद्रीत करीत आहोत.  ज्यामध्ये ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यावर भर आहे. आम्ही संभावित गुंतवणूकदारांशी चर्चा करीत आहोत.