मुंबई :  Airtel नंतर आता Vodafone-Ideaच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. Vodafone-Idea ने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली असून सर्व प्लॅनमध्ये सुमारे 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. हे नवे दर 25 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. (Vodafone-Idea New Tariff Plan) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 नोव्हेंबरपासून व्होडाफोन-आयडिया (Vi) चे सर्व प्लान्स महाग होणार आहेत. आता तुम्हाला डेटा कॉलिंग प्लानसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.  काल Airtel ने देखील आपल्या ग्राहकांना धक्का दिला आणि टॅरिफ प्लानमध्ये वाढ करण्याची घोषणा केली.


प्लॅन 20-25% महाग 
नवीन दरांनुसार कंपनीचा स्वस्त प्लॅन आता 99 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा प्लॅन 79 रुपयांना उपलब्ध होता. आता या प्लॅनमध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम, 200MB डेटा आणि एक पैसा प्रति सेकंद व्हॉइस टॅरिफ मिळेल. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.


149 रुपयांचा प्लॅन 179 रुपयांवर 
याशिवाय 149 रुपयांचा प्लॅन 179 रुपयांचा झाला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS आणि 2GB डेटा मिळेल. या योजनेचा कालावधी 28 दिवसांचा आहे.


56 दिवस, 2GB/दिवस डेटा योजना
जर तुम्हाला 56 दिवसांचा प्लान घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी 539 रुपये खर्च करावे लागतील. पूर्वी हा प्लॅन 449 रुपयांचा होता. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि 2GB डेटा दररोज मिळेल. या प्लॅनचा कालावधी 56 दिवसांचा आहे.


84 दिवस, 2GB/दिवस डेटा योजना
जर तुम्हाला 84 दिवसांचा प्लान घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी 839 रुपये खर्च करावे लागतील. पूर्वी हा प्लॅन 699 रुपयांचा होता. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि 2GB डेटा दररोज मिळेल. या प्लॅनचा कालावधी 84 दिवसांचा आहे.