मुंबई : भारतीय दूरसंचार क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका विषयाची बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दूरसंचार क्षेत्रात विविध सेवा पुरवणाऱ्या वो़डाफोन या कंरनीकडून त्यांचा भारतातील सर्व व्यवसाय बंद करण्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे. सातत्याने होणारी घट, कोट्यवधींच्या कर्जाचा बोजा पाहता आता भारतातील वोड़ाफोनच्या सर्व सुविधा बंद केल्या जाणार असल्याचं म्हणज जे ग्राहक या सुविधा वापरतात त्यांना दुसऱ्या दूरसंचार कंपनीच्या सुविधा पुरवण्यात येणार असल्याचंही म्हटलं जात होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वर्तुळात सुरु असणाऱ्या याच चर्चांना आता थेट कंपनीकडूनच पूर्णविराम लावण्यात आला आहे. मुळच्या युके येथील असणाऱ्या वोडाफोनकडून या सर्व चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. वोडाफोन आयडियाच्या साथीने भारतात सुविधा देणाऱी ही कंपनी सध्या अडचणींचा सामना करत असली तरीही ती भारतातून काढता पाय घेणार नाही आहे. किंबहुना त्याविषयीच्या सर्व चर्चा तथ्यहीन असल्याचं वोडाफोनकडून सांगण्यात आलं आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, 'भारतातून वोडाफोन काढता पाय घेणार असल्याच्या अफवांविषयी वोडाफोनला (वोडाफोनसाठी कार्यरत असणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना) माहिती आहे. आम्ही इतकंच सांगू इच्छितो की हे खरं नाही. सध्याच्या घडीला कंपनी भारत सरकारशी चर्चा करत आहे, ज्यांनी या कठीण प्रसंगी आम्हाला मदतीची हमी दिली आहे', असं या कंपनीकडून सांगितलं जात आहे. 




दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आय़एएनएसच्या वृत्तानुसार कोणत्याही दिवशी वोडाफोन भारतातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात आलं होतं. व्यापारात होणारी घट आणि अर्थव्यवस्थेत होणारे बदल या साऱ्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक गणितांवर होत असल्यामुळे ते या निर्णयावर पोहोचल्याचं सांगण्यात आलं होतं. तेव्हा आता या साऱ्यावर नेमकी पुढे कोणती पावलं उचलली जाणार, शासनातर्फे वोडाफोनला मदतीचा हात दिला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.