भोपाळ : कर्नाटकात भाजपानं काँग्रेस-जेडीएसच्या सत्तेला सुरूंग लावल्याच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशात काँग्रेसनं भाजपाला दणका दिलाय. विधानसभेमध्ये गुन्हेगारी कायदा विधेयकावर झालेल्या मतदानात भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षादेश डावलून कमलनाथ सरकारच्या बाजुनं मतदान केलं. मतदानात १२२ मतं कमलनाथ सरकारच्या बाजुनं पडलीत. नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी ही बंडखोरी केली असून आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. मात्र मूळचे काँग्रेसचेच असलेल्या त्रिपाठी आणि कोल यांनी अद्याप भाजपामधून राजीनामा दिलेला नाही. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला काठावरचं बहुमत आहे. कर्नाटक सरकार पडल्यानंतर हाच प्रयोग मध्य प्रदेश, राजस्थानात करण्याची भाषा भाजपा करत असतानाच पक्षाला हा दणका बसलाय, हे विशेष... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांच्या बंडखोरीमुळे मध्यप्रदेश भाजपाला मोठा धक्का बसलाय. उल्लेखनीय म्हणजे, कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडल्यानंतर भाजपा मध्यप्रदेशातही सरकार पडल्याचा दावा करत आहे. मात्र दोन आमदारांनी क्रॉस वोटींग केल्यानं इथं भाजपा भांबावलीय. येत्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडणार या भाजपाचा दावा पक्षाच्याच अंगाशी आल्याचं चित्र इथं दिसतंय.