Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. 15 फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सेवेत आली. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रती तास 100 किमी वेग आणि आरामदायी प्रवास ही खास वैशिष्ट्य प्रवाशांना चांगलीच पसंतीस पडली आहेत. त्यानंतर आता सरकार वंदे भारत मेट्रोही (Vande Bharat Metro) आणणार असल्याची चर्चा सुरु झाली. देशातील करोडो रेल्वे प्रवाशांना वंदे भारत मेट्रो कधी सुरु होणार याची उत्सुकता आहे. देशातील अनेक मोठ्या शहरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. वंदे भारत एक्स्प्रेस देशात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आता वंदे भारत मेट्रोची उत्सुकताही वाढली आहे. यादरम्यान वंदे भारत मेट्रोचा पहिला लूक समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठे तयार होतेय मेट्रो?
वंदे भारत मेट्रोची पहिली झलक समोर आली आहे. पंजाबच्या कपरूथलामध्ये असलेल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे भारत मेट्रोचं काम सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या वंदे भारत मेट्रोची ट्रायल रन जुलै 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. वंदे भारत मेट्रोमुळे रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवासाबरोबरच कमी किंमतीत वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. वंदे भारत मेट्रो इंटर सिटी आणि इंट्रा सीटीदरम्यान धावणार आहे. एका बड्या रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2024 मध्ये मेट्रोची चाचणी झाल्यानंतर लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. 


वंदे भारत मेट्रो आताच्या लोकप्रिय वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतिकृती आहे. वंदे मेट्रोसाठी खास डिझाईन तयार करण्यात आलं आहे. वंदे भारत मेट्रोचा वेग ताशी 130 किलोमीटर इतका असणार आहे. मेट्रोचं जाळं देशातील 124 शहरातील 100 ते 125 किमी अंतर पसरलं असेल.


वंदे भारत मेट्रोचं वैशिष्ट्य
रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वंदे भारत मेट्रो कमीत कमी 12 डब्यांची असेल. प्रत्येक डबा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. प्रवाशांच्या प्रतिक्रिया, गर्दी आणि मागणीच्या आधारावर मेट्रोच्या डब्यात वाढ केली जाणार आहे. जास्तीत जास्त 16 डब्यांपर्यंत वाढ करणं शक्य होणार आहे. कमी वेळेत जास्त अंतर कापण्याचं या मेट्रोचं उद्दीष्ट्य असणार आहे. चाचणीनंतर देशभरात मेट्रो लाँच केली जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच वंदे भारत मेट्रोही पांढऱ्या आणि भगव्या रंगात असण्याची शक्यता आहे.