PF Amount Transfer: ईपीएफओकडून लवकरच आपल्या खातेदारांना ही आनंदाची बातमी दिली जाणार आहे. ईपीएफओ लवकरच खात्यात जमा झालेल्या रकमेवर वार्षिक व्याज जमा करणार आहे. पण पूर्ण व्याज हवे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा व्याजात तोटा सहन करावा लागू शकतो. सध्या सरकार पीएफ खात्यावर 8.1% व्याज देत आहे.  सध्या खासगी क्षेत्रातील लोक नोकऱ्यांमध्ये ठराविक कालावधीनंतर बदल करतात. नवीन नोकरीच्या ठिकाणी जुन्या UAN वरूनच नवीन कंपनीमध्ये पीएफ खाते उघडले जाते. त्यामुळे नवीन कंपनीचे पैसे नवीन पीएफ खात्यात येतात आणि जुन्या पीएफ खात्यात पैसे येणे बंद होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत जुन्या खात्यातील पैसे नवीन खात्यात विलीन न केल्यास व्याजाच्या रकमेत तोटा होऊ शकतो. तुम्हाला जुन्या पीएफ खात्यात असलेल्या रकमेवर व्याज हवे असल्यास, सर्व खाती एकत्र करणे फायद्याचे आहे. यासाठी सर्व पीएफ खाती सध्याच्या कंपनीच्या पीएफ खात्याशी लिंक करा. अशा परिस्थितीत, ईपीएफओ​​च्या वेबसाइटवर जा आणि सर्व खाती मर्ज करा, अन्यथा तुम्हाला कमी व्याज मिळेल.


तुमचे पीएफ खाते विलीन करायचे असेल, तर UAN अॅक्टिव्हेट केला पाहीजे. जर UAN सक्रिय नसेल, तर ते EPFO ​​वेबसाइटवर जाऊन अॅक्टिव्हेट UAN वर क्लिक करून सक्रिय करावा लागेल. आवश्यक माहिती भरून UAN सक्रिय केले जाईल.


पीएफ खाते विलीनीकरण प्रक्रिया


  1. जुने आणि सध्याचे पीएफ खाते एकत्र करण्यासाठी, ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. लॉगिन करा

  3. सर्व्हिसेस मध्ये जा

  4. One Employee-One EPF खात्यावर क्लिक करा.

  5. एक फॉर्म उघडेल

  6. तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका

  7. UAN आणि तुमचा विद्यमान EPF खाते आयडी प्रविष्ट करा.

  8. त्यानंतर ओटीपीचा पर्याय निवडा.

  9. आता मोबाईलवर ओटीपी येईल.

  10. ओटीपी टाकल्यानंतर जुने पीएफ खाते दिसेल.

  11. जुन्या पीएफ खात्याची नोंदणी करा.

  12. डिक्लेरेशन एक्सेप्ट करा आणि सबमिट करा.

  13. यानंतर व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही दिवसांत खाते मर्ज केले जाईल.