मुंबई : कोरोनाच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रावर खोलवर परिणाम झाला होता, मात्र आता या क्षेत्रातील परिस्थिती सुधारू लागली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी तुमच्यासाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, देशातील कोणती बँक गृहकर्जावर किती व्याज आकारते? जेणे करुन तुम्हाला लोन घेताना सोयचं होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा बँकांची यादी सांगत आहोत, जिथे स्वस्त दरात गृह कर्ज उपलब्ध आहे.


युनियन बँक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनियन बँक पगारदार कर्मचार्‍यांना 6.40 टक्के सुरुवातीच्या व्याजदरासह गृहकर्ज देते. दुसरीकडे, स्वयंरोजगार असलेल्या लोकांना 6.50 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. बँकेच्या मते, परवडणाऱ्या दरात गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर 800 पेक्षा कमी असावा. याशिवाय उत्पन्नात सातत्य असावे.


बँक ऑफ बडोदा


तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून गृहकर्ज हवे असेल, तर तिथून तुम्हाला सुरुवातीला 6.50 टक्के दराने गृहकर्ज मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना देखील 6.50 टक्के दराने गृहकर्ज मिळत आहे. 10 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज या बँकेमार्फत दिले जाते.


बँक ऑफ इंडिया


तुमचा CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला 6.50 टक्के दराने गृहकर्ज दिले जाते. यासह, बँक कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के प्रक्रिया शुल्क देखील आकारते, जे किमान 1500 रुपये आणि कमाल 20 हजार रुपये आहे.


कोटक महिंद्रा बँक


विशेष ऑफर अंतर्गत, कोटक महिंद्रा बँक 10 डिसेंबरपर्यंत गृहकर्ज घेणार्‍यांना 6.55 टक्के प्रारंभिक व्याजदराने गृहकर्ज देत आहे. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी 6.06 टक्के प्रारंभिक व्याजदराने कर्ज देत आहे.


ICICI बँक


तुम्ही ICICI बँकेद्वारे गृहकर्ज घेतल्यास, ते तुम्हाला 6.70 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. त्याच वेळी, स्वतःचा व्यवसाय सुरू करणार्‍या लोकांना 6.06 टक्के प्रारंभिक व्याजदराने कर्ज दिले जात आहे.