पैसा दुप्पट करायचाय का ? Post Office च्या योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षा आणि परताव्याची सरकारी गॅरंटी
पोस्ट ऑफिसची एक उत्तम स्किम आहे ज्याचा अवधी 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने इतका आहे.
नवी दिल्ली : प्रत्येकाला असे वाटते की आपल्या कष्टाचा पैसा अशा ठिकाणी गुंतवावा की, जेथून परतावा चांगला येऊ शकेल. परंतु चांगल्या परताव्यासह पैसा सुरक्षित देखील रहायला हवा. पोस्ट ऑफिसची एक उत्तम स्किम आहे ज्याचा अवधी 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने इतका आहे. जर तुम्ही मोठी रिस्क घेऊ इच्छित असाल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नसाल तर, पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम तुमच्यासाटी चांगला पर्याय आहे. पोस्टाच्या किसान विकास पत्रातील गुंतवणूक लॉंगटर्म साठी फायद्याची मानली जात आहे.
किसान विकासपत्र काय आहे?
किसान विकासपत्र भारत सरकारची एक रकमी गुंतवणूक करणारी स्कीम आहे. ज्याअंतर्गत एका विशिष्ठ अवधीत आपला पैसा दुप्पट होतो. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस बँकांमद्ये उपलब्ध आहे. त्याचा म्युच्युरिटी पिरियड 124 महिने इतका आहे. त्यामध्ये कमीत कमी 1000 रुपये गुंतवणे गरजेचे ठरते. जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची कोणतही मर्यादा नाही.
किसान विकासपत्र 1000 रुपये, 5000 रुपये, 10 हजार रुपये आणि 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रमाणपत्र आहे. ज्यांना खरेदी करता येते.
प्रमाणपत्र कसे विकत घ्यावे.
1 सिंगल होल्डर टाइप सर्टिफिकेट - स्वतः किंवा कोणत्याही अल्पवयीन साठी खरेद करता येईल
2 संयुक्त A अकाऊंट सर्टिफिकेट - दोन व्यक्तिसाठी संयुक्त स्वरूपात जारी केले जाते.
किसान विकास पत्राचा फायदा
1 या स्कीमवर गॅरंटीसह रिटर्न मिळते. यावर बाजाराच्या चढ उताराचा कोणताही परिणाम होत नाही.
2 म्युच्युरिटी परिअड संपल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रक्कम परत मिळते.
3 या स्किम अंतर्गत इनकम टॅक्सच्या सेक्शन 80 सी अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळत नाही.
4 या स्किम अंतर्गत मिळणारे व्याज पूर्णतः करपात्र आहे.
5 किसान विकासपत्राचे प्रमाणपत्र तारण ठेऊन तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.