Viral Video : दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सोशल मीडियावर दिवाळीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. अशातच एका कॉलेजच्या हॉस्टेलमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो एका कॉलेजच्या वसतिगृहामधील आहे. घरापासून लांब राहून शहरांमध्ये मुलं चांगले शिक्षण घेण्यासाठी येत असतात. हॉस्टेल म्हणजे त्यांच्या जीवनातील खास क्षण असतो. या ठिकाणी त्यांना वेगवेगळे मित्र भेटतात. हेच मित्र आयुष्य कसे जगायचे हे देखील शिकवत असतात. या मुलांना सणांमध्ये घरी जाता येत नाही. त्यामुळे ते वसतिगृहामध्ये आपले सण साजरा करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका मुलांच्या हॉस्टेलमधील आहे. दिवाळीमध्ये घरी न जाता, या मुलांनी हॉस्टेलमध्ये दिवाळी साजरी केली आहे. ज्यामध्ये हॉस्टेलमधील काही मुलं एकमेकांच्या अंगावर रॉकेट सोडत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की युद्धच सुर आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय? 


ऐन दिवाळीत एका मुलांच्या हॉस्टेलमधील व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये दोन गटात वाद झाल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोन्ही गटातील मुले एकमेकांच्या वसतिगृहामध्ये रॉकेट सोडताना दिसत आहेत. हे पाहून तुम्हाला देखील एखादे युद्ध सुरु असल्यासारखे वाटेल. पण असं नाहीये. या मुलांनी दिवाळीमधील फटाक्यांचा वापर करून एकमेकांच्या वसतिगृहावर आक्रमण केले आहे. दोन्ही बाजूंनी हे युद्ध सुरु होते. फटाख्यांच्याद्वारे हे विद्यार्थी आपली ताकद दाखवत आहे. व्हायरल व्हिडीओ असे दिसत आहे की, हॉस्टेलमध्ये रॉकेट घुसले असून त्या ठिकाणी आग लागली आहे. 



नेटकऱ्यांकडून व्हिडीओवर तुफान कमेंट


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजलेले नाही. पण सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ दिवाळीमधील असल्याचं वाटत आहे. सध्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जात आहे. काही नेहटकऱ्यांनी म्हटलं आहे की, इस्त्रायल आणि लेबनॉनमधील युद्धापेक्षा हा हल्ला धोकादायक आहे.