धक्कादायक! रागाच्या भरात `या` नेत्याने महिलेच्या छातीवर मारली लाथ
...
नवी दिल्ली : तेलंगणामधील निझामाबाद येथे एक लाजीरवाणा प्रकार घडला आहे. येथे सत्तेवर असलेल्या तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे नेते इम्मादी गोपी आणि एका महिलेत वाद झाला. हा वाद जमिनीच्या वादातून झाला असल्याचं समोर येत आहे. वाद इतका वाढला की, इम्मादी गोपी यांनी चक्क महिलेच्या छातीवर लाथ मारली.
तेलंगानातील निझामाबाद जिल्ह्यामधील इंदालवई गावात ही घटना घडली आहे. टीआरएसचे नेते गोपी आणि गावातील महिलेत जमिनीच्या विषयावरुन वाद झाला. यावेळी महिलेने गोपी यांना मारण्यासाठी चप्पल उचलली. मात्र, त्यापूर्वी गोपी यांनी महिलेला लाथ मारली.
गोपी यांनी महिलेला लाथ मारताच तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तिने गोपी यांना जोरात धक्का दिला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
या प्रकरणी इम्मादी गोपी यांच्या विरोधात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर इम्माद गोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गोपी यांनीही महिले विरोधात आणि तिच्या परिवाराविरोधात संपत्तीचं नुकसान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.