मुंबई : Trending News: अनेक राज्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. धरणी तापलेली असताना आजी चक्क बेशुद्ध पडली. कच्छ येथे कडाक्याच्या उन्हात काय करायचं, असा विचार करीत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने असा आधार दिला की आजीचा जीव वाचला. हाच खरा माणसातला देव दिसून आला. उष्माघातामुळे बेशुद्ध झालेल्या आजीबाईंना पाठिवर घेतले आणि पायपीट करत तिचे प्राण वाचवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उष्माघाताने अनेक लोक आजारी पडण्याचा प्रकार वाढत आहे. चक्कर आल्याच्या तक्रारीही अनेक ठिकाणाहून समोर येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी उष्णतेमुळे बेशुद्ध झालेल्या महिलेला मदत करताना दिसत आहे.


सामान्यत: पोलिसांचे मुख्य काम हे सामान्य जनतेला मदत करण्याबरोबरच त्यांच्या परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे असते. सोशल मीडियावर वेळोवेळी पोलिसांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात, ज्यामध्ये ते सर्वसामान्यांना मदत करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिसांनी दाखवलेली माणुसकी पाहून यूजर्सची मने जिंकली आहेत.



व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये गुजरातमधील एक महिला पोलीस एका वृद्ध महिलेला पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शन देताना लिहिले की, 'गुजरातमधील वर्षा परमार या महिला कॉन्स्टेबलने कच्छमधील एका 86 वर्षीय वृद्धाला तब्येतीच्या समस्येमुळे पाठीवर उचलले आणि जळत्या रणमध्ये 5 किलोमीटर पायपीट करत सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. सध्या चित्रात एक महिला पोलीस एका वृद्ध महिलेला खांद्यावर घेऊन रखरखत्या उन्हात घेऊन जाताना दिसत आहे.  यूजर्स महिला पोलिसांचे कौतुक करताना दिसत आहेत.