हैदराबाद : तेलंगनाच्या महबूबनगर जिल्ह्यातील एका महिला पोलिसाकडून एका महिला कंडक्टरला मारहाण केल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य परिवहनच्या एका कर्मचा-याने सांगितले की, ही घटना २७ सप्टेंबरची आहे. रजीता कुमारी महबूबनगर डेपोपासून तेलंगाना राज्य परिवहन निगमच्या बसमध्ये चढली. कंडक्टरने तिला तिकीट घेण्यास सांगितले. तर तिने ओळखपत्राची झेरॉक्स दाखवलं. पण कंडक्टरने मुळ ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं.  


हा बसमधील व्हिडिओ एका प्रवाशाने काढला असून तो अनेक वॄत्तवाहिन्यांनी दाखवला आहे. व्हिडिओत दिसतं की, दोघींमध्ये बाचाबाची झाल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने महिला कंडक्टरला धक्का दिला. तिला मारहाण केली. यानंतर काही लोकांनी त्यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. 



या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी परिवहन निगम कर्मचा-यांनी मोर्चा काढला होता. तर महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना महबूबनगर पोलीस अधिक्षक बी अनुराधा यांनी सांगितले की, प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल.