नवी दिल्ली : शहरी भागात बिबट्या दिसल्याचे प्रमाण वारंवार समोर येत आहेत. आता असाच एक प्रकार मध्यप्रदेशातील इंदूर येथे घटला आहे. यावेळी बिबट्याने एकावर हल्लाही केलाय. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूर परिसरात जंगलातील एक बिबट्या शिरला. रहिवासी परिसरात बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरु झाली.


मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (९ मार्च) रोजी जंगलातुन एक बिबट्याने रहिवासी परिसरात प्रवेश केला. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली. 


नागरिकांना पाहून बिबट्याने घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला रस्ता मिळाला नाही त्यावेळी त्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. बिबट्याने हल्ला करताच या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने खेचलं आणि त्याचे प्राण वाचवले.



वन विभागाचा कर्मचारी जखमी 


बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला. मग, वन विभागाने अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडलं.