नवी दिल्ली : संरक्षममंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी भारत-चीन सीमेवरील नाथुला परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी भारत आणि चिनी सैनिक, पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादही साधला. 


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षणंमंत्री निर्मला सीतारमन यांनी चीनी सैनिकांसोबत संवाद साधत त्यांना नमस्ते म्हटलं आणि त्याचा अर्थही समजावून सांगितला. निर्मला सीतारामन यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत सीतारमन या चिनी सैनिकांना नमस्तेचा अर्थ सांगताना दिसत आहेत.


व्हिडिओमध्ये दिसत आहे की, निर्मला सीतारमन भारतीय परंपरेनुसार सर्वांना नमस्कार करत अभिवादन करत आहेत. त्यानंतर त्यांनी चिनी सैनिकांना नमस्तेचा अर्थ विचारला. मात्र, कुणालाही उत्तर देता आलं नाही. मग, निर्मला सीतारमन यांनी सांगितलं की, ज्या प्रमाणे चीनी भाषेत इतरांना हॅलो म्हणण्यासाठी नी हाओ म्हणता त्याचप्रमाणे भारतामध्ये हात जोडून नमस्ते म्हणतात.



निर्मला सीतारमन ज्यावेळी नाथुला परिसरात दाखल झाल्या त्यावेळी पलीकडच्या बाजुला असलेल्या अनेक चिनी सैनिकांनी मला पाहिले, जे नाथुला येथे पोहाचून माझा फोटो काढत होते.


सिक्कीमच्या सीमेवर असलेल्या डोकलाम परिसराची हवाई पाहणी निर्मला सीतारमन करणार होत्या. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा हवाई दौरा रद्द करण्यात आला. सिक्कीमच्या एक दिवसीय दौऱ्यावर आलेल्या सीतारमन यांनी गंगटोकपासून ५२ किमी दूर असलेल्या नाथुला परिसराची पाहणी केली. तसेच तेथे असलेल्या भारतीय सैन्याची आणि भारत-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी)च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.