श्रीनगर : संपूर्ण जगभरात Christma नाताळ सणाच्या उत्साहाने परिसीमा गाठली आहे. जगाच्या या टोकापासून ते अगदी त्या टोकापर्यंत प्रत्येक कानाकोपऱ्यात सर्वजण या सणाच्या रंगात रंगून गेले आहेत. आप्तेष्टांची भेट घेत, कोणा खास व्यक्तीला तितकीच खास भेटवस्तू देत शक्य त्या सर्व परिंनी हा सण साजरा केला जात आहे. असं असताना देशसेवेत रुजू असणारे जवान कसे बरं यापासून दूर राहतील? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमसचा हाच उत्साह सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्या अनेक जवानांमध्येही पाहायला मिळाला. त्यांच्या याच उत्साहाची प्रचिती देणारा एक व्हिडिओ एएनाय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये संपूर्ण काश्मीरमध्ये Kashmir नियंत्रण रेषेपाशी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये हे सर्व जवान अतिशय आनंदाच्या वातावरणात 'जिंगल बेल्स जिंगल बेल्स' हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये 'स्नो मॅन' आणि चक्क सँटाक्लॉजही दिसत आहे. 


#Christmasच्या निमित्ताने विराटरुपी सँटाक्लॉज बच्चेकंपनीच्या भेटीला आला अन्...


नियंत्रण रेषेवर असणाऱी तणावाची परिस्थिती आणि सातत्याने या भागात गस्त घालणाऱ्या या जवानांच्या भेटीसाठी हा नाताळबाबासुद्धा इतक्या मैलांचा प्रवास करत त्यांच्यापर्यंत पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये काश्मीच्या नियंत्रण रेषेपाशी असणारा जवानांचा हाच उत्साह हेवा वाटण्याजोगा आहे. 


ख्रिसमसच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या साऱ्यांमध्ये बर्फाच्छादित काश्मीरमध्ये या सणाच्या आनंदात नाहलेल्या जावानांचा व्हिडिओ विशेष लक्षवेधी, असं म्हणायला हरकत नाही. 




दरम्यान, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश या भागांमध्येही नाताळ सणामुळे वातावरण बहरलं आहे. गोव्यामध्ये वाहतुकचे नियम पाळले जावेत आणि या गर्दीच्या आणइ वरदळींच्या दिवसांमध्ये नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी चक्क वाहतूक पोलिसांनीच सँटाक्लॉजचा वेश धारण केल्याचंही पाहायला मिळालं.