नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण वाचलंय-ऐकलंय की पाणी जीवन आहे. मात्र पाणी जीवन सुद्धा आहे आणि इंधन सुद्धा आहे. शंभरीच्या घरात पेट्रोल-डिझेलचे दर गेले आहेत. अशा स्थितीत दिल्लीतल विद्यार्थ्यांनी पाण्यापासून इंधन तयार केलंय. ज्यावर गाडी पळेल आणि तिही स्वतात. त्यामुळे भविष्यात गाडी चालवण्यासाठी तुम्हाला पेट्रोल-डिझेलची गरज पडणार नाही. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दिल्लीतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पाण्यापासून पेट्रोल तयार केलं आहे. ते ही कमी पैश्यांमध्ये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकचं नाही तर हे इंधन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असेल. त्यामुळे तुमच्या शहराची हवा स्वच्छ राहील. महागड्या तेलाची झंझटही राहणार नाही. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये तुमची गाडी चक्क पाण्यावर चालणार आहे. दिल्लीतील आयआयटीच्या या प्रयोगशाळेत पाण्यापासून तयार होणा-या इंधनाची दृश्ये जरुर बघा. 



आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी कमी खर्चात पाण्यापासून हायड्रोजन इंधन वेगळं करण्याचं तंत्र शोधून काढलंय. हायड्रोजन प्रोडक्शन पायलट प्लॅन्टमध्ये इंधन बनवण्यात आलंय. पाण्यापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेचा हा पहिला टप्पा होता. सामान्यपणे पाण्यापासून २००० हजार डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानावर ऑक्सीजन आणि हाइड्रोजन वेगळं होतं. 


मात्र आयआयटीच्या या टीमने हे सल्फर आयोडीन थर्मोकेमिकल हाइड्रोजन प्रक्रियेच्या सहाय्यानं अधिक सुलभ केलं आहे. या प्रक्रियेत आयोडीन आणि सल्फर याचा वापर करुन हायड्रोजन आणि ऑक्सिजन १५० डिग्री सेल्सिअस तापमानावर वेगळं केलं जात. या प्रयोगावर चार प्रक्रिया होणार आहेत. चौथ्या टप्प्यात इंधनाचं सॅम्पलं जमा करुन निरीक्षण केलं जातं. आता ते दिवस दूर नाहीत. पाण्यापासून बनवलेल्या इंधनावर तुमची इकोफ्रेंडली कार जोरात पळणार आणि तिही स्वस्तात.