Wayanad Landslide : शाळकरी मुलीची गोष्ट खरी ठरली; वायनाडमध्ये तंतोतंत असंच घडलं
वायनाड येथे भूस्खलनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण एका शाळकरी मुलीने लिहिलेल्या गोष्टीत केरळ वायनाडच्या दुर्घटनेची भविष्यवाणी दडलेली होती. काय होती मुलीची गोष्ट?
केरळ वायनाडमध्ये निसर्गाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मध्यरात्री नागरिक तेथील साखर झोपेत असताना झालेल्या भुस्खलनामुळे आतापर्यंत 300 हून लोकांनी आपला जीव गमावला आहे. अजूनही अनेकजण जखमी आहेत तर काही नागरिकांचं शोधकार्य सुरु आहे. वायनाडमध्ये जिथे जिथे नजर जाते. तिथे तिथे फक्त आणि फक्त रागावलेल्या निसर्गाचं एक रुप दिसत आहे.
एकेकाळी निसर्गाच्या श्रीमंतीनंनी समृद्ध असलेली, देवभूमी म्हणून ओळखली जाणारे ही भूमी आज फक्त वेदनेने भरलेली दिसत आहे. अनेक लोकांच्या अतिशय दुःखाने भरलेल्या वेगवेगळ्या गोष्टी देखील समोर येत आहेत. असं असताना एका लहान मुलीची आणि तिच्या गोष्टीची खूप चर्चा होत आहे. यामध्ये मुलीने केरळच्या या आपत्तीची भविष्यवाणी केली होती.
कारण या मुलीने आपल्या कथेत दिलेले संदर्भ आणि कथेचा शेवट हा या सगळ्या दुर्घटनेची मिळती जुळती आहे. 14 वर्षांच्या लयाने डिजिटल मॅगझिनमध्ये जी गोष्ट लिहिली ती अगदी तंतोतंत वानयडमध्ये खरी ठरली आहे.
काय आहे ही गोष्ट
राज्य सरकारच्या केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन (KITE) प्रकल्पाद्वारे लिटल KITEs उपक्रमांतर्गत 'वेल्लाराम कल्लुकल' नावाचे मासिक नुकतेच शाळेत प्रकाशित करण्यात आले. 'अग्रहातिन्ते दुरनुभवम' (इच्छेची शोकांतिका) ही कथा आलमकृत आणि अनासवारा या दोन मुलींबद्दल आहे, ज्या शाळा सुटल्यानंतर आपल्या गावातील नदीकाठावर फिरण्याचा प्लान करतात. आणि नदीकाठी चालत चालत एका धबधब्यापर्यंत पोहोचतात. यावेळी दोन्ही मुली धबधब्याच्या सौंदर्याचे कौतुक करत असताना एक पक्षी तिथे येतो. हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. पक्षी त्यांना म्हणाला, 'मुलांनो, इथून लवकर पळा कारण मोठा धोका आहे. जर तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर येथून ताबडतोब पळून जा. मुलांना हा इशारा दिल्यानंतर पक्षी उडून गेला.
पक्ष्याचा इशारा ऐकून मुले वेगाने पळू लागली. इयत्ता 8 वी विद्यार्थिनी लयाने तिच्या कथेत लिहिले आहे की, एक मुलगी धबधब्यात बुडते. पण ती पुर्नजन्म घेते. आणि तिचा हा जन्म एका पक्ष्याच्या रुपात असतो. इतर लोकांना सावध करण्यासाठी ती पक्ष्याच्या रूपाने परत येते. पक्षी म्हणाले, "मुलांनो, इथून (गावातून) पळून जा कारण पुढे धोका आहे." मुलं पळत सुटतात पण जेव्हा त्यांनी टेकडीकडे पाहिले तेव्हा त्यांना टेकडीवरून पावसाचे पाणी वाहताना दिसले. आणि ते पाहतात की पक्षी एका सुंदर मुलीमध्ये बदलला होता जो त्यांना सावध करण्यासाठी परत आला होता. या कथेत वर्णन केल्याप्रमाणे केरळमध्येही असाच विनाश घडला हा विचित्र योगायोग आहे.
केरळमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान
मंगळवारी केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन आणि मुसळधार पावसाने गावे उद्ध्वस्त केली. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामला आणि नूलपुझा या गावांना पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाला. भूस्खलन झाला तेव्हा बहुतेक लोक आपापल्या घरात झोपले होते. केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या देशातील त्या सहा राज्यांमध्ये केरळचा समावेश आहे.