नवी दिल्ली : केवळ भारतच नव्हे तर, चीनच्या शेजारील सर्वच देश चीनच्या आडमुठेपणाला वैतागले आहेत. चीनचा अडमुठेपणा इतका टोकाचा की केवळ भारतासारखा शक्तीमान देशच नव्हे तर, चिमूकल्या बोत्सवानासारख्या देशानेही चीनच्या दादागिरीला विरोध केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर बोत्सवाना हा दक्षिण अफ्रिकेतील एक चिमूकला देश. हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशावर चीन दादागिरी करू पाहतोय. चीनच्या या नसत्या उठाठेविला हा देश चांगलाच वैतागला असून, या देशाने चीनच्या उद्योबद्धल तीव्र शब्दांत प्रतिक्रीया दिली आहे. 'आमचा विचार करायला आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे चीनने आम्हाला काही सांगू नये. आम्ही चीनचे गुलाम नाही आहोत', अशा शब्दांत बोत्सवानाने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.


तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा हे बोत्सवानाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरून राजकीय आणि इतर परिणाम भोगण्यास तयार राहा अशी धमकी चीनने दिली होती. चीनच्या धमकीवर बोलताना बोत्सावानाचे राष्ट्रपती इयान खामा यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.