`मोदी म्हणजे दुसरे गांधीजी`
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे गांधीजी असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे गांधीजी असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केलं आहे. महेश शर्मा यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी आणि मोदींनी अनेक पिढ्यांना प्रेरित केल्याचं महेश शर्मा म्हणालेत. गांधींच्या मीठाच्या सत्याग्रहाबाबत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सांस्कृतिक मंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय.
'आमच्यामध्ये आणखी एक गांधीजी आहेत'
आपल्याला पंतप्रधानांच्या रुपात आणखी एक गांधीजी मिळाले आहेत हे आपलं सौभाग्य आहे, असंही महेश शर्मा म्हणालेत. मीठाचा सत्याग्रह फक्त एक मूठ मिठासाठी नव्हता तर यामुळे अनेक पिढ्यांना प्रेरित करण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया महेश शर्मांनी दिली आहे. गांधीजींचं स्वप्न पूर्ण करणं हेच मोदींचं स्वप्न असल्याचं शर्मा या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.