नवी दिल्ली : मशिदीची जमीन मशिदीलाच मिळायला हवी असं अशी मागणी, आपण सर्वोच्च न्यायालयातल्या पुनर्विचार याचिकेत करणार असल्याचं बाबरी ऍक्शन समितीचे कन्वेनर जफर याब जिलानी यांनी सांगितलं आहे. याच संबंधींचं विधान नुकतंच एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. ओवेसींच्या विधानाचं जिलानी यांनी समर्थन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबरी मशीदीचे पक्षकार असलेल्या व्यक्तींना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने बैठक बोलवली होती. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर पुर्नविचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा झाली. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल ला बोर्डाचे कन्वेनर जफरयाब जिलानी यांनी ही बैठक बोलावली होती. 


इकबाल अंसारी यांनी मात्र या बैठकीला जाणं टाळलं. त्यांनी म्हटलं की, 'आम्हाला देशात शांती हवी आहे. आम्हाला आता याला आणखी पुढे नाही घेऊन जायचं. त्यामुळे आम्ही या बैठकीला गेलो नाही. कमेटीत पाच पक्षकार आहे. कोर्टाने जो निर्णय घेतला त्याचा सन्मान झाला पाहिजे. कोणतंही असं काम करु नये ज्यामुळे देशात अशांती पसरेल. मी जबाबदार आहे. देशामध्ये अमन आणि शांतीचा संदेश देत राहिल.'