नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांना डॉक्टर, नर्सेस यांचे आभार मानले. त्यांनी विविध सामाजिक संस्थांचे देखील आभार मानले. संकट काळात देशातील लोकांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत करावी. असं आवाहन देखील त्यांनी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देश दिवसरात्र काम करत आहे. गेल्या काही दिवसात अनेक महत्त्वाची पाऊलं उचलण्यात आली आहे. ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली आहे. यावर काम सुरु आहे. राज्यात नवे ऑक्सीजन प्लांट लावण्यात येत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सीजन मेडिकलसाठी वापरण्यात येत आहे. औषधांचं उत्पादन वाढवलं आहे. प्रोडक्शन वाढवण्यासाठी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. आपल्या देशात मजबूत फार्मा सेक्टर आहे. रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्याचा काम सुरु आहे. विशाल कोविड रुग्णालयं बनवली जात आहेत.'


'भारतात कोरोनावरील सर्वात स्वस्त वॅक्सीन विकसित झाली. लसीकरणात गती वाढली आहे. सरकारी रुग्णालयात मोफत वॅक्सीन मिळेल. जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आर्थिक व्यवहार कमीत कमी प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. श्रमिक वर्गाला ते आहेत तिथेच राहण्याचा विश्वास राज्यांनी दिला पाहिजे.'


'विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. प्रसारमाध्यमांनी देखील सतर्क आणि जागृत करण्याचा प्रयत्न आणखी वाढवावा. अफवा आणि भ्रम यामध्ये लोकांनी येऊ नये. लॉकडाऊनपासून वाचायचं आहे. मायक्रो कंटेंमेंट झोनवर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. मर्यादांचं पालन करावे हाच श्रीरामांचा विचार आहे. कोरोनाच्या विरुद्ध लढा जिंकण्यासाठी अनुशासन महत्त्वाचं आहे.' असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.