मुंबई : भारत-चीनमधील वादावर काँग्रेस नेता आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहने भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की,'आम्ही १९४८,६५,७१,९९ चे युद्ध जिंककले आहे. आता तुमची वेळ आहे. चीनी युद्धाला उत्तर द्या.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० च्या दशकापासून चीनशी आपला संघर्ष आहे. गलवान ही पहिलीच घटना नाही. मला खात्री आहे की भारत सरकार सीमेवर सैन्य मजबूत करत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी केंद्रातील भाजप सरकारला भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांकडून पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडामध्ये मिळालेली देणगी परत करण्यास सांगितले. 



पुढे मुख्यमंत्री असे म्हणाले की,'मला वाटते चीनच्या विरोधात आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे. मला वाटत नाही की जेव्हा आपले सैनिक शहीद होतात. तेव्हा आम्ही चीनी कंपन्यांकडून पैसे घेऊ शकतो. १५-१६ जूनच्या मध्यरात्री लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिक ठार झाले आहेत.'


सध्या भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे केंद्र झालेल्या गलवान खोऱ्यातून भारताच्यादृष्टीने चिंतेची आणखी एक बातमी समोर आली आहे. येथील गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात पहारा देणाऱ्या भारतीय जवानांना आता पाण्यापासून बचाव करणारे Waterproof पोशाख देण्याची गरज आहे. 


विशेष म्हणजे चीनने यापूर्वीच ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या सर्व सैनिकांना Waterproof पोशाख दिले होते. त्यामुळे गलवान नदीच्या थंड पाण्यातही हे जवान तासनतास उभे राहून पहारा देऊ शकतात. मात्र, भारतीय जवानांकडे अजूनही अशाप्रकारचे Waterproof कपडे नाहीत. त्यामुळे बर्फ वितळून गलवान नदीतील पाणी आणखी वाढल्यास भारतीय जवानांसमोर समस्या उद्भवू शकतात.