Weather Forecast : देशभरातून अखेर मान्सूननं (Monsoon) माघार घेतली आहे. चार महिन्यांसाठी मुक्काम असणाऱ्या मान्सूननं यंदा जरा जास्तच दमदार हजेरी लावली आणि सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. (Maharashtra Rain) राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, देशाच्या किनारपट्टी भागावर सध्या एक वादळ घोंगावत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालच्या उपसागरात सितांग नावाच्या चक्रीवादळामुळं तब्बल 12 राज्यांना यलो अलर्ट (Yello Alert) देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल (West Bengal) लगतच्या समुद्राला लागून असणाऱ्या 1460 किमी अंतरावर दक्षिण -पूर्वेला उत्तर अंदमानच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं हे वादळ उदभवत आहे.


(Cyclonic storm) हवमान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोबरला हे वादळ प्रवास सुरु करून उत्तर पूर्वेला पुढे सरकेल. 25 तारखेच्या आसपास ते बांगलादेशच्या किनारपट्टीला ओलांडून पुढे जाईल. यावेळी थायलंडकडून या वादळासाठी 'सितांग' हे नाव देण्यात आलं आहे. वादळाचा एकंदर धोका पाहता किनारपट्टी भागांमध्ये तटरक्षक दलं सतर्क झाली आहेत. काही भागांमधअये नागरी सेवांमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.


अधिक वाचा : Today Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, चेक करा पेट्रोल डिझेलचे नवे दर ...


चक्रिवादळाचा (Cyclone) धोका पाहता 23 ते 26 ऑक्टोबरच्या दिवसांमध्ये मासेमारांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IMD च्या माहितीनुसार वातावरणातील बदलांमुळे बंगाल आणि ओडिशा या भागांमध्ये वादळाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. परिणामी इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


कोणकोणत्या राज्यांमध्ये पावसाची हजेरी ?
हवमान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार अंदमान निकोबार द्वीप समुह, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, ओडिशा. या भागांमध्ये ताशी 55 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील आणि यादरम्यान मुसळधार पाऊसही होणार आहे. महाराष्ट्राला (Maharashra Rain) चा थेट तडाखा बसणार नसला, तरीही काही किनारपट्टी भागांमध्ये वादळाचा परिणाम नाकारता येत नाही.