Weather Forecast : भारतात थंडीचे लाट आली आहे. काश्मिर, लडाखमध्ये रक्त गोठवणारी थंडी पहायला मिळत आहे. जम्मू काश्मिरमध्ये पारा मायनस 5.9 अंशावर गेला आहे. तर, लडाखमध्ये सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. लडाखमध्ये मायनस 24 डिग्री तापमानाची नोंद जाली आहे. आजपर्यंतची ही रेकॉर्डब्रेक थंडी असल्याचे बोलले जात आहे. लाडखपासून  जम्मू काश्मिर पर्यंत पडलेल्या भयानक थंडीचा कहर दिल्लीकरही अनुभवत आहेत. 


हे देखील वाचा.... भारताच्या बॉर्डवर असलेल्या या देशात मिळते दुबई पेक्षा स्वस्त सोनं; देशाचे नाव ऐकून शॉक व्हाल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर आणि लडाखमध्ये दिवसेंदिवस तापमानात घट पहायला मिळत आहे. 19 डिसेंबर रोजी श्रीनगरमध्ये हंगामातील सर्वात थंड रात्रीची नोंद झाली आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे 6.2 पर्यंत घसरले आहे. तर लडाखमधील झोजी ला हिमालयीन पर्वत रांगेत रक्त गोठवणाऱ्या तापमानाची नोंद झाली. झोजी ला मध्ये उणे 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  ला निना चा हा परिणाम असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.  


IMD अर्थात हवामान विभागाने शीत लहरीचा इशार दिला आहे.  श्रीनगरमध्ये या मोसमात आतापर्यंतची सर्वात थंड रात्र होती. काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वत्र किमान तापमान शून्याच्या खाली गेले आहे. जम्मू काश्मिरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. कश्मिर मधील डल लेक सह सर्व सरोवरं देखील गोठली आहेत. संपूर्ण शहरातील पाण्याच्या पाइपलाइन, घरांमधील नळ, नदी नालेही कडाक्याच्या थंडीत गोठले आहेत. या बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद झाले असून, जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.  जगप्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे किमान तापमान उणे 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे उणे 6.5 अंश आणि दक्षिण काश्मीरमधील कोकरनागमध्ये उणे 5.8 अंश तापमानाची नोंद झाली. 


काश्मिर मधील 40 दिवसांच्या प्रदीर्घ थंडीचा कालावधी चिल्लई कलान म्हणून ओळखला जातो.  21 डिसेंबर पासून काश्मिरमध्ये 'चिल्लई कलान' सुरु होणार आहे.  चिल्लई कलान दरम्यान  27 डिसेंबरच्या रात्रीपासून 28 डिसेंबरच्या सकाळपर्यंत काही उंचावरील भागात हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत, हिवाळा सर्व जुने रेकॉर्ड मोडू शकतो. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काश्मिरमध्ये चिल्लई कलान कालावधी 31 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे.  यानंतर, काश्मीरमध्ये 20 दिवस ‘चिल्लई-खुर्द’ (लहान थंडी) आणि 10 दिवस ‘चिल्लई-बच्छा’ (सौम्य थंडी) अशा प्रकारे थंडीचा मुक्काम असणार आहे.