Seasons coldest day in Delhi: राजधानी दिल्ली कडाक्याच्या थंडीने गारठली आहे. (Weather Forecast) सध्या दिल्लीत तापमान 2.8 अंश सेल्सियस आहे. दिल्लीच्या दाट धुक्याचा परिणाम रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही झाला आहे. ( Weather News )पुढच्या दोन दिवसांत गारठा आणखी वाढण्याचा अंदाज असून दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वेसेवा साडेचार तास लेट आहे. तर विमान उड्डाणांवरही त्याचा परिणाम झालाय. दिल्लीत येणा-या 19 ट्रेन्स दीड तास ते साडे चार तास उशिरानं धावतायत. तर 21 विमान उड्डाणांवरही दाट धुक्याचा परिणाम झाला आहे. 


गारव्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांनंतर गारव्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. उत्तरेकडील काही राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. त्यासोबतच मध्य प्रदेशापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्याचा परिणाम म्हणून विदर्भात पावसाळी स्थिती निर्माण झालीय. मात्र, पुढील दोन दिवसांनंतर राज्यातील तापमानात आणखी घट होऊन गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे.


Maharashtra Weather News : राज्यात थंडी वाढणार, या आठवड्यात तापमान कसं असेल ते जाणून घ्या


आणखी काही दिवस दिल्लीतील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. किमान तापमान 2.5 ते 3 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर थंडीची लाट ओसरून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशी तीव्र थंडी पडणार आहे. 8 जानेवारीनंतर थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



पारा घसरल्याने दैनंदिन जनजीवनावर परिणाम


महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. धुळ्यात पारा 7.6 अंश सेल्सीयसवर आलाय. त्यामुळे दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. थंडीच्या संभाव्य लाटेपासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपाययोजना सुचविल्या आहेत. अतिशय आवश्यकता असेल तरच घराबाहेर जावं नाहीतर घरीच थांबा असा सल्ला देण्यात आलाय.  थंडीपासून संरक्षण करण्यासाठी धुळ्यात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध शेजारच्या व्यक्तीकडे लक्ष द्या,  शक्य झाल्यास रूम हीटरचा वापर करा असा सल्ला प्रशासनाने दिलाय. 



 उपराजधानी नागपुरात काय आहे स्थिती ?


 गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीनं नागपुरात कमबॅक केलंय. आज सकाळपासूनच नागपूरवर धुक्याची चादर पसरली होती. नागपुरात पारा 16 अंशांवर आलाय. पारा घसरण्यासह थंड वारे वाहातयत. त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवतेय. काल दुपारपासूनच शहरासह जिल्ह्यात बोचरी थंडी आणि ढगाळ हवा होती. उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम नागपूरवर दिसून येतोय. स्वेटर, उबदार कपडे घालूनच नागपूरकर बाहेर पडतायत. शहरात जागोजागी शेकोट्या पेटल्यायत. नागपूर ग्रामीण सह विदर्भातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने गारठा ची तीव्रता अधिक जाणवत आहे.