Weather Updates: पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार, या दिवशी पाऊस करणार कमबॅक!
जाणून घेऊया हवामानाच्या स्थितीवर विभागाचा नेमका काय अंदाज आहे.
दिल्ली : देशाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असली तरी तो अजूनही अनेक भागांत सक्रिय आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्सूनचे पुनरागमन होणार असून 13 ऑक्टोबरपर्यंत देशाच्या अनेक भागात पुन्हा पाऊस पडेल, असे हवामान खात्याचं म्हणणं आहे. जाणून घेऊया हवामानाच्या स्थितीवर विभागाचा नेमका काय अंदाज आहे.
5 ऑक्टोबरनंतर पुन्हा मुसळधार पाऊस
हवामान खात्याच्या मते, देशात मान्सूनची निरोप दरवर्षी 20 सप्टेंबरपासून सुरू होतो. मात्र, यावेळी ते 13 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे यावेळी कमी दाबाचा मान्सून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात एक्टिव्ह आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर म्हणजेच 5 ऑक्टोबरनंतर मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे मान्सून थांबला
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नोरू' नावाचं सुपर चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावर कायम आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून माघारी फिरू शकत नाही. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून देशाच्या विविध भागात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच थंड वारेही वाहतील, त्यामुळे दिवसाचे तापमानही कमी होऊन लोकांना थंडी जाणवू लागेल.
शेतकऱ्यांना फायदा होईल
ते पुढे म्हणाले, यावेळी देशाच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात मान्सूनने सरासरीपेक्षा 5 टक्के जास्त पाऊस केला आहे. सलग चौथ्या वर्षी एवढा चांगला पाऊस पडताना दिसत आहे. यामुळे रब्बी पिकांच्या पुर्नलागवडीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत होणार असून त्यांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार नाही.
महापात्रा म्हणाले की, 13 ऑक्टोबरचे नोरू चक्रीवादळ देखील कमकुवत होईल. त्यामुळे यंदाचा मान्सूनही पूर्ण निरोप घेणार आहे.