मुंबई : असं म्हणतात की, जोडी ही स्वर्गात ठरवली जाते. ज्यामुळे तुमच्या भाग्यात लिहिलीले व्यक्ती तुमच्यापासून कितीही लांब असली, तरी ती तुम्हाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या मार्गावर भेटतेच. असंच काहीसं बिहारमधील जोडप्यांच्या बाबतीत घडलं आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच हे जोडपं ट्रेंडिंगवर आलं आहे. खरंतर बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात अनोखं लग्न पार पडलं, जेथे एका 34 इंचाच्या वधूचं लग्न 36 इंचाच्या नवरदेवाशी लावण्यात आलं आहे. आहे ना आश्चर्याची गोष्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उंचीने इतकी कमी असलेल्या नववधूने किंवा त्या नवरदेवाने कधीही विचार देखील केला नसावा की, त्यांना आयुष्याचा जोडीदार मिळेल. परंतु ते दोघेही एकमेकांना भेटलेच.


बिहारमधील भागलपूरमध्ये हे अनोखं लग्न पार पडत असताना, वधू आणि वर दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी हजारो लोक पोहोचले, तेही कोणत्याही आमंत्रणाशिवाय. भागलपूरमध्ये हा अनोखा विवाह पार पडला आणि सात फेऱ्या घेतल्यानंतर हा विवाह सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.


अनोख्या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा


नवगचिया येथील अभिया बाजार येथील रहिवासी किशोरी मंडल यांची मुलगी ममता कुमारी 24 वर्षांची आहे. दुसरीकडे, मसारू रहिवासी बिंदेश्वरी येथील मुलगा मुन्ना भारती हा 26 वर्षांचा आहे. या दोघांचे अनोखे लग्न पूर्ण रितीरिवाजाने पार पडले.


या अनोख्या लग्नानंतर, वधू-वर जेव्हा सबूर ब्लॉकमधील मसारू गावात पोहोचले तेव्हा सासरच्या लोकांनी ममताचे भव्य स्वागत केले आणि दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


ममता आणि मुन्ना यांनी सांगितले की, दोघेही त्यांच्या लग्नामुळे खूप आनंदी आहेत आणि लग्नानंतर ते एकमेकांना भेटायला खूप चांगले दिसत आहेत.


खरंतर अशा लोकांची समाजात चेष्टा केली जाते, मात्र याबाबत जेव्हा  ममता आणि मुन्ना यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, ''आम्हाला त्याची पर्वा नाही आम्ही अभिमानाने एकमेकांसोबत आयुष्य जगू.''