तुम्हाला माहितीये का लग्नाचाही Insurance काढता येतो? त्याचा काय फायदा होतो? किती खर्च येतो?
Wedding Insurance Benefits Know Details in Marathi: अगदी पाण्यासारखा पैसे खर्च केलेल्या लग्नाचा विमा खरेदी करणे ही सध्या काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
Wedding Insurance Benefits Know Details in Marathi: आजकाल लग्नाचे सरासरी बजेट काही लाखांमध्ये असते. लग्न समारंभ, रिसेप्शन या सर्वाचा विचार केला तर आयुष्यातील सर्वात महागड्या कार्यक्रमांपैकी एक असलेला हा सोहळा. अगदी पाण्यासारखा पैसे खर्च केलेल्या लग्नाचा विमा खरेदी करणे ही सध्या काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लग्नाचा विमा काढून घेणे ही एक स्मार्ट कल्पना असू शकते. मात्र लग्न सोहळ्याची विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वी त्यामध्ये काय काय कव्हर होईल आणि काय नाही हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. त्यावरच नजर टाकूयात..
लग्नाचा विमा म्हणजे काय?
लग्नाचा विमा हा विमा धोरणांअंतर्गत एका विशेष प्रकारच्या कार्यक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या विम्याअंतर्गत येतो. उत्सव, सणवार आणि मोठ्या कार्यक्रमांशी संबंधित समस्यांच्या माध्यमातून येणाऱ्या संकटापासून आर्थिक संरक्षण या विम्यामध्ये दिलं जातं. लग्नाच्या विम्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. ते खालील प्रमाणे
लग्न दायित्व विमा :
याला इंग्रजीमध्ये वेडिंग लायबिलीटी इन्श्यूरन्स (Wedding liability insurance) असं म्हतात. दायित्व विमा तुम्हाला मालमत्तेचे नुकसान किंवा तुमच्या इव्हेंट दरम्यान झालेल्या दुखापतींसाठी भरपाई करण्यात फायद्याचा ठरतो. उदाहरण घ्यायचं झालं तर लग्नात एखाद्या उत्साही पाहुण्याने हॉलमधील एखादी खिडकी किंवा वस्तूची तोडफोड केली तर अशा विमा पॉलिसमध्ये त्याचा मोबदला दिला जाऊ शकतो. संबंधित वस्तू बदली करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी पैसे अशा विम्यातून मिळतात.
लग्न रद्द करणे किंवा पुढे ढकलणे :
इंग्रजीत वेडिंग कॅन्सलेशन ऑर पोस्टपोर्न इन्श्यूरन्स (Wedding cancellation or postponement insurance) असं म्हणतात. लग्न सोहळ्यामध्ये आपल्या नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे समारंभ किंवा रिसेप्शन रद्द करावे लागले किंवा पुढे ढकलावे लागल्यास या विम्यामध्ये तुम्हाला परतफेड मिळते. उदाहरणार्थ, अत्यंत हवामानामुळे (चक्रीवादळ किंवा भूकंप किंवा पूर), आजारपण, दुखापत किंवा एखाद्या अन्य गोंधळामुळे समारंभ रद्द झाल्यास ही विमा पॉलिसी तुम्हाला इन्श्यूरन्स कव्हर देऊ शकते.
लग्नाच्या विम्याची किंमत किती आहे कसं ठरतं?
लग्नाच्या विम्याची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते जसे की:
- लग्नाचे स्थान
- विमा जारी करणारा विमाकर्ता
- कव्हरेजची एकूण रक्कम
- लग्नाचा आवाका
- इतर घटक
लग्न विम्यात भेटवस्तू कव्हर होतात का?
लग्नाची विमा पॉलिसी सामान्यत: हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या भेटवस्तूंना कव्हर करत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या विमा योजनेत लग्न गिफ्टच्या पर्यायाचा समावेश करुन घेत नाही.
लग्नाचा विमा ब्रेकअप कव्हर करतो का?
दुर्दैवाने, लग्नाचा विमा सामान्यत: जोडपे विभक्त झाल्यामुळे लग्न रद्द झाल्यास अशा स्थितीत पैसे परत करत नाही. म्हणजेच स्वइच्छेने लग्न मोडलं तर ब्रेकअप कव्हर मिळत नाही.
लग्न विमा कोठे खरेदी करता येतो?
लग्नाचा विमा काही प्रमुख विमा कंपन्यांद्वारे विकला जातो. तुमच्या ओळखीतील इन्श्यूरन्स एजंटकडे याची माहिती मिळेल. तसेच थेट कंपन्यांशी संपर्क साधला तरी महिती पुरवली जाते.
खर्च किती?
10 ते 15 हजाराच्या प्रिमियमवर 40 लाखांपर्यंतचा विमा भारतामधील लग्नासाठी उपलब्ध होतो.