आता मी त्याच्या वडिलांना काय सांगू? लेकिनं `त्या` मुलाला दिलेला नकार पाहून वडिलांनाही धक्का
वय वाढतंय... लग्न कधी करणार असाच प्रश्न मुलं वयात आल्यानंतर आई-वडिल त्यांना विचारत असतात.
मुंबई : वय वाढतंय... लग्न कधी करणार असाच प्रश्न मुलं वयात आल्यानंतर आई-वडिल त्यांना विचारत असतात. लग्नाचा हा टप्पा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो. काहींच्या तो अगदी लवकर येतो, काहीच्या जीवनात लग्न अगदी वेळेत होण्याचा योग असतो तर काही मात्र, ताटकळत जोडीदाराची वाट पाहत राहतात.
अशा लेकरांसाठी मग आई-बाबा शोधमोहिम सुरु करतात आणि त्यांचं कसहब पणाला लावतात. मॅट्रीमोनिअल साईट, ओळखीतली माणसं आणि शक्य त्या सर्व मार्गांनी ही मंडळी आपल्या लेकरांच्या लग्नासाठी शोधमोहिम राबवतात. (Wedding proposal daughters reply to father)
त्यांनी निवडलेल्या स्थळांना मुलं मात्र सर्सा नकार देतात. त्यासाठी अर्थात ही तरुण पिढी कारणंही तशीच देते. सध्या एकाएकी लग्न आणि आईवडिलांचा हा विषय प्रकर्षानं पुढे येण्याचं कारण म्हणजे त्यांच्या व्हायरल होणारा एक फोटो.
बंगळुरूस्थित Salt या स्टार्टअपटी संस्थापिका उदिता पाल हिला तिच्या वडिलांनी एका मुलाचं स्थळ सुचवलं होतं. त्याचं प्रोफाईलही पाठवलं होतं. पण, तिनं त्याचं प्रोफाईल पाहून थेट त्याला आपल्या कंपनीत नोकरी करण्याची ऑफर दिली.
लेकिनं केलेली ही कामगिरी कानी पडताच वडिलांनी तिला मेसेज करत तिची शाळा घेण्याचा प्रयत्न केला. 'तू मॅट्रिमोनिअल साईटवरून मुलांना नोकरीवर ठेवू नाही शकत... आता मी त्याच्या वडिलांना काय उत्तर देऊ?', अशा शब्दांत वडिलांनी उदिताकडे नाराजी व्यक्त केली.
सोशल मीडियावर खुद्द उदितानंच या चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि पाहता पाहता, याचीच चर्चा सुरु झाली. सध्याच्या पिढीची एकंदर मानसिकता आणि नात्यांकडे अगदी सहजपणे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही यातून दिसला.