नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी नवरीनं फोटोग्राफरला पाण्यात ढकलून दिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून लग्नातील खास क्षण किंवा गमती-जमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी नववधूसोबत गंमत करतानाचे तर कधी मजामस्करी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नामंडपात एक फोटोग्राफर फोटोशूट करताना अचानक खाली पडल्याचा व्हि़डीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की फोटोग्राफर फोटो काढण्य़ात मग्न असताना अचानक त्याला तोल जातो आणि तो स्विमिंग पूलमध्ये पडतो. त्याला दुसरा सहकारी वर येण्यासाठी मदत करतो. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 



हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याला एक हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर लोकांहीनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.