मुंबई : भारतात लग्न आणि खास करून लग्नाची वरात (Barai Dance) ही बघण्यासारखी असते. अनेकदा आपण पाहतो लग्नात की, नवरदेवाचे किंवा नववधुचा मित्र परिवार नागिन डान्स अथवा बॉलिवूड गाण्यावर डान्स करत असतात. यामुळे लग्नातल वातावरण अगदी भारी होऊन जात. असंच काहीस एका लग्नात झालंय. या लग्नातलं वेगळेपण म्हणजे चक्क नवरदेवाच्या वहिनीचा कूल अंदाज यामध्ये पाहायला मिळाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 


भररस्त्यात जमली मंडळी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर लग्नाचे आणि खास करून वरातीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर रील्सवर एक वरातीचा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओत नवरदेव घोडीवर बसला आहे. त्याच्या दोन्ही वहिन्या भर रस्त्यात मस्त होऊन डान्स करताना दिसत आहेत. नवरदेवाच्या वहिन्या लहंगा घालून भर रस्त्यावर 'लो चली मै अपने देवर की बारात ले के' या गाण्यावर ठेका धरला आहे



नवरदेवाने देखील केला खास स्टेप्स आपल्या लाडक्या वहिनींना डान्स करताना बघून घोडीवर बसलेल्या नवरदेवाने देखील ठेका धरला. वहिनींसोबत अगदी घोड्यावर बसूनच डान्स केले. या वरातीत काहीजण आपला ग्रुप फोटो घेण्यातही व्यस्त होते.


आणखी बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीला घेऊन जाण्यासाठी वरात घेऊन आला आहे. उंची कपडे घालून थाटामाटात आलेला हा नवरदेव सर्वांचे आकर्षण ठरतो आहे. लग्नमंडपात एंन्ट्री मारताच नवरदेवाच्या मेहुण्यांनी त्याचे जंगी स्वागत केले आहे. मेहुण्यांनी त्याच्यासमोर धडाकेबाज डान्स केला आहे.