मुंबई : नवरदेव म्हटलं की, त्याचा चारचौघात शोभून दिसणारा अंदाज, भलताच रुबाब असंच चित्र पाहायला मिळतं. पण, काहीतरी हटके अंदाजात आपल्याच लग्नासाठी पाहुण्यांनाही थक्क करणारा नवरदेव तुम्ही पाहिलाय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाही, तर एका व्हिडीओमध्ये तुम्हाला याचीही झलक पाहायला मिळेल. आता ही चूक म्हणा किंवा मग ठरवून घेतलेला निर्णय पण, एका व्हायरल व्हिडीओमुळे लग्नसोहळ्यापेक्षा चक्क नवरदेवाचा सेहराच जास्त लक्ष वेधत आहे. 


डोक्यापासून पायापर्यंत सेहरा... 
सहसा उत्तर भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये नवरदेवाचा चेहरा हा सेहऱ्यानं झाललेला असतो. साधारण संपूर्ण चेहरा झाकला जाईल इतका मोठा हा सेहरा असतो. पण, खदीर नावाच्या एका युजरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाला चक्क डोक्यापासून पायापर्यंत भलामोठा सेहरा घातल्याचं दिसत आहे. लग्नसोहळ्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात पण, हा सेहऱ्याचा व्हिडीओ पाहता नेटकरीही अवाक् झाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Abdul Khadeer (@khadeer7395)



'दूल्हे का सेहरा सुहाना लगता है...'  असं म्हणत काही नेटकरी या व्हिडीओवर रिअॅक्ट झाले आहेत. तर, काहींनी इथं 'सुहाना' ऐवजी 'दूल्हे का सेहरा बडा सा लगता है...' असं म्हणत या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्यावर धमाल कमेंटही केली आहे.