मुंबई : सोशल मीडिया हे लोकांना माहिती पुरवण्याबरोबरच त्यांचे मनोरंजन देखील करतो, त्यामुळे लोकं जास्तीत जास्त काळ सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याचदा असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात ज्याला एकदा पाहून आपले मन भरत नाही, ज्यामुळे आपण पुन्हा पुन्हा असे व्हिडीओ पाहातो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर नंतर ट्रेंडींग होतात. आता लग्नाचा सिझन सुरु आहे, ज्यामध्ये लग्नातील विधीचे, संगीत किंवा मेहेंदीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात, त्यांपैकी काही व्हिडीओ खूपच मजेदार असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला काही ना काही शिकवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वधू-वरासाठी नाही तर लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाईकांच्या कृत्यामुळे ट्रेंडिंग (Treanding video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूचे नातेवाईक संकटात सापडले आहेत.


होय, इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, वधू आणि वर लग्न मंडपात विधी पार पाडत असल्याचे तुम्ही पाहू शकता. विधीदरम्यान नातेवाईक वधू -वरांच्या डोक्यावर लाल रंगाची ओढणी घेऊन उभे असतात. या ओढणीचा एक टोक मुलीच्या नातेवाईकांनी तर दुसरे टोक मुलाच्या नातेवाईकांनी पकडला आहे आणि ते ही ओढणी आपल्या बाजूला ओढत आहेत. 


हे सगळ घडत असताना एका छोट्याशा चुकीमुळे एक अपघात घडला. परंतु नशीबाने मोठा अनर्थ टळला.


कारण ओढणीची ओढाओढ करताना वधूच्या बाजूला उभे असलेले नातेवाईक लग्नासाठी लावल्या गेलेल्या हवनमध्ये पडतात. ज्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष पडले. ही महिला त्या आगीत पडली असली तरी नशीबाने तिला काहीही झाले नाही, परंतु तिच्या मागे असलेल्या एका व्यक्तिचा हात त्या आगीत गेला. 5 सेकंदांपेक्षा कमी वेळेचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे.


इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, लग्नात काही वेळा सुरू असलेली मजा मस्करी काही प्रमाणात करावी, नाहीतर त्याचे परिणाम फार वाईट होऊ शकतात.


हा व्हिडीओ तसा पाहाण्यासाठी जरी मजेदार वाटत असला, तरी याने लोकांसमोर एक उदाहरण उभे केले आहे. कारण ही घटना जरी इतकी गंभीर दिसत नसली तरी, तरी हा अपघात मोठा होऊ शकला असता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोक सोशल मीडियावर या व्हिडीओ खूप पसंत करत आहेत. निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडीओवर आपले मत देखील व्यक्त केले आहेत.