सात भावांनी बहिणीला दिली खास बिदाई; व्हिडिओ व्हायरल
लग्न कार्यात असे अनेक भावूक क्षण आपण सर्वांनी अनुभवले आहेत.
मुंबई : सध्या लग्न सराई सुरू आहे. सोशल मीडियावर देखील लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यामधील काही व्हिडिओंमुळे आपल्याला हासू येतं, तर काही व्हिडिओ भावूक करणारे असतात. लग्न कार्यात असे अनेक भावूक क्षण आपण सर्वांनी अनुभवले आहेत. खरं तर नवरीच्या कुटुंबामध्ये असे क्षण सर्रास पाहायला मिळतात. आता देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सात भाऊ बहिणीसाठी डान्स करताना दिसत आहे.
सर्व भावांना एकत्र पाहून नवरीच्या डोळ्यात देखील आश्रू दाटून आले. नवरी एका जागेवर बसली आहे. त्यानंतर तिचे सात भावंड तिच्या जवळ येतात आणि बहिणीला डान्स मंडपात आणतात. सर्व भावांनी 'फुलो का तारो का सबका...' या गाण्यावर डान्स केला आणि नवरीला प्रत्येकाने गुलाबाचं फुल दिलं.
या भावूक व्हिडिओमध्ये सर्व भावांनी एकाच रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे की, तिचे सातही भाऊ तिच्यावर प्रचंड प्रेम करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 40 हजार युझर्सने पाहिलं आहे.