मुंबई : लग्न म्हटलं की, मजा मस्ती, चालीरिती, नाच गाणे सगळं काही येतं. लग्नात वधू वरांप्रमाणे कुटुंबीयांसोबत देखील खूम मजा करतात. यावेळी वधू वर हे लग्नाचे मुख्य आकर्षण असतात. काही लोकं या सोहळ्यातील काही सुंदर, आनंदी आणि मजेदार क्षणं लोकं सोशल मीडियावर देखील टाकतात. जे पाहून आपले देखील मनोरंजन होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात तसे पाहाता इतक्या गोष्टी करण्यासारख्या असतात की, आपण किती ही करायला गेलो तरी काही तरी कमी पडतेच. त्यात काही चुका देखील घडतात, ज्याची लोक थट्टा देखील करतात. अशीच एक घटना एका लग्नात घडली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, नवदेवाच्या चुकीमुळे नवरीला शरमेने मान खाली घालावी लागते.


खरेतर एका लग्नाच्या संगीत सोहळ्यानिमित्त नवीन जोडपे डान्स परफॉर्मन्स देत आहे. मॅचिंग ड्रेससह, हे दोघेही बॉलिवूड गाण्यांवर अतिशय सुंदर डान्स करत आहेत, परंतु  नवऱ्याच्या छोट्याशा चुकीमुळे वधू-वरांना सगळ्यांसमोर शरमेनं मान खाली घालावी लागली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


संगीतमध्ये नाचताना नवरदेव आपल्या भावी वधूला त्याच्या खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो स्टेजवरच तिच्याबरोबर पडतो. परंतु नंतप नवरदेव थोडा प्रयत्न करुन वर उठतो आणि त्याचा डान्स पुढे सुरू ठेवतो. परंतु नंतर त्यांच्या चेहऱ्यावर लाजीरवाने हावभाव पाहायला मिळाले. या सगळ्यात वधूला जास्त लाजीरवाने वाटले. परंतु हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.