Wedding Video : लग्नमंडपात वधूची `दादागिरी`, नवरदेवाला थेट लावलं पळवून, पण का?
एक मजेदार परंतु एक उदाहरण ठेवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
मुंबई : लग्नाची तयारी कितीही केली तरी ती कमीच पडते. तसेच कितीही प्रयत्न केला तरी लग्नात छोटा मोठा घोळ होतोत. तसेच लग्नाचे अनेक छोटे मोठे किस्से देखील घडत असतात. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुम्हाला लग्नाचेच व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. कारण सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे बहुतेक लग्नातील व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ हे खरोखरचं खूप मनोरंजन करणारे असतात. जे आपल्याला खूप हसवतात. तर काही व्हिडीओमुळे आपल्यासमोर एक उदाहरण देखील उभे रहाते.
असाच एक मजेदार परंतु एक उदाहरण ठेवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मंडपात नवरा नवरीचे भांडण
या लग्नाच्या व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या मंडपात नववधू आणि नवरदेव लग्न विधी पार पाडत असतात. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीशी वधू बोलू लागते. तेवढ्यात तेथील वातावरण तापते आणि काही रहस्य वधू समोर येते, ज्यामुळे वधू रागवते आणि रागाच्या भरात ती त्या माणसावर हात उगारते.
त्यानंतर ते भांडण कमी करण्यासाठी नवरदेव मधे पडतो आणि भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु घडतं काही भलतचं. कारण नवऱ्याचं ऐकूण घेण्या एवजी नववधू त्याच्यावरच ओरडते आणि तिचा राग इतका वाढतो की, ती त्याला मारायला हात उगारते.
खरेतर नवरदेव गुटखा खाऊन लग्न मंडपात बसलेला असतो, भांडणात मध्यस्थी करताना नववधूच्या लक्षात येते की, नवऱ्याने गुटखा खाल्ला आहे. तेव्हा ती त्याला मारते आणि त्याच्या या कृतीबद्दल त्याला ओरडते आणि लगेच जाऊन त्याला तो गुटखा थूकूण येण्यासाठी सांगते.
या व्हिडीओमध्ये वधू -वरांचे हे भांडण पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. कारण ती गावची वधू असली तरी, तिचा तो स्वॅग आणि बोलण्याची पद्धत लोकांना खूप आवडली आहे. ती ज्यापद्धतीने सगळ्या गावकऱ्यांच्या समोर आपल्या नवऱ्याला शिस्त लागण्यासाठी त्याला ओरडते आणि ते थूकूण यायला लागते.
या व्हिडीओला लोकांकडून खूप पसंत केले जात आहे. सोशल मीडियावर लोकांनी भरभरुन कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.