मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ पाहिले असणार. हे व्हिडीओ विधीदरम्यानचे असतात. काही व्हिडीओ हे खूप मजेदार असतात जे पाहून तुमचं मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओ हे वधू -वरांचे गोंडस क्षणांचे असतात, तर काही आपल्याला शिकवण देऊन जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वधू लग्न करायचं नाही म्हणून नाटकं करत होती, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही आणि अखेल तिला नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालावीच लागली. वधूची ही नाटकं सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नवरीचा भोळा-भाबडा चेहरा, आणि लग्न करण्यासाठीची तिची धडपड लोकांना खूप आवडली आहे.


व्हिडिओ क्लिपमध्ये वधू आणि वर स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. दोघांच्या हातात माला आहे. हा व्हिडीओ वरमाला घालण्याच्या सोहळ्यादरम्यानचा आहे.


या व्हिडीओमध्ये वधू ज्या प्रकारचे एक्सप्रेशन्स देत आहे ते पाहून असे दिसते की, हे लग्न तिच्या इच्छेविरूद्ध होत आहे आणि ती त्यात नाखूश आहे. या दरम्यान, वधू रागाने वारंवार वरमाला हलवून त्यातील फूल पाडण्याचा किंवा ती खराब करण्याचा ती प्रयत्न करते. हे पाहून नवरदेव थोडा अस्वस्थ होतो. तेव्हा एक महिला वधूकडे मदत करायला येते आणि तिला हार घालायला सांगते.


या नवरीने कितीही नाटकं केली तरी अखेर तिला या मुलासोबत लग्न कराव लागलंच. कारण तिचे लग्न न करण्याचा हा शेवटचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ही व्हिडीओ क्लिप official_niranjan_kgm नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला गेली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर, बहुतेक यूजर्स हे लग्न मुलीच्या इच्छेविरुद्ध होत असल्याचे सांगत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, 'हा भाऊ टिकणार नाही'. त्याचवेळी, दुसऱ्या यूजरने मुलावर दया करत कमेंट केली की, 'लग्नापूर्वी ही परिस्थिती आहे, तर याचं पुढे काय होईल.' यासह, त्याने एक हसणारा इमोजी शेअर केला. तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'या मुलीला जबरदस्ती केली जात आहे.'