Gold Price Weekly: सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्याचा भाव 52 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. (weekly gold price update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. आठवडाभर सोन्याच्या दरात वाढ झाली. दरम्यान दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.  


या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचे भाव वाढू लागले. मंगळावारने त्यात जोरदार झेप घेतली आणि तो 50,391 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 51,169 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. या आठवड्यात मंगळवारीच सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. दसऱ्यानिमित्त बुधवारी बाजार बंद होता. गुरुवारीही सोने महाग झाले आणि तो 51,792 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.


किती महाग झाले सोने –


IBJA दरांनुसार गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 50,362 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्यांच्या मते या आठवड्यात सोने 1546 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे.


वाचा : Aadhaar Card हे 4 प्रकार माहितीयेत का? तुम्हाला असा होईल फायदा


24 कॅरेट सोन्याची किंमत –


इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (Indian Bullion and Jewelers Association) नुसार, 7 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,908 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत.


सोन्यावरील जीएसटी चार्जेस (GST Charges on Gold) वेगळे भरावे लागतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर तुम्हाला मेकिंग चार्जेससह जीएसटी भरावा लागेल. त्यामुळे दागिन्यांच्या किमती वाढल्या आहेत.