नदीत पडून बसला भीषण अपघात, ३६ प्रवाशांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी एक बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ३६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. प्रवाशांची बस पुलाचं कठडं तोडून घोगरा नदीत पडली.
बहरमपूर (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी एक बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ३६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. प्रवाशांची बस पुलाचं कठडं तोडून घोगरा नदीत पडली.
अपघातानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या.
संतप्त नागरिकांचा हल्ला
अपघातानंतर पोलिसांनी येण्यास कथित उशीर केल्याने लोकांनी प्रदर्शन केलं आणि संतप्त नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या एका गाडीला पेटवून दिले. त्यानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केलाय.
किती होते प्रवाशी?
पोलिसांनी सांगितले की, अपघातातील काही प्रवाशांचा मृत्यू रूग्णालयात उपचारा दरम्यान झालाय. जखमींना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. सकाळी सगळेच प्रवासी गार झोपेत होते. त्यामुळे इतक्या जणांना आपला जीव गमवावा लागला. स्थानिकांनी दावा केलाय की, बसमध्ये साधारण ५० ते ६० प्रवाशी होते.
धुक्यामुळे झाला अपघात - मुख्यमंत्री
घटनास्थळावर पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, ड्रायव्हरने चुकी केली असावी आणि धुकंही होतं. मृतकांच्या कुटुंबियांना ५-५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली. तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर केली आहे.