नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election) 148 उमेदवारांची नावे जाहीर केली. कोलकाताच्या चौरंगी विधानसभेत कॉंग्रेसचे माजी नेते दिवंगत सोमण मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा(Sikha Mitra) यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. पण त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखा मित्रा (Sikha Mitra)  यांनी निवडणूक लढण्यास नकार का दिला ? याची चर्चा रंगू लागली. यावर त्यांनी दिलेले उत्तर भाजपला धक्का देणारे होते. 'मी कुठूनही निवडणूक लढवत नाही. माझ्या परवानगीशिवाय माझ्या नावाची घोषणा केली गेली आहे. मी भाजपमध्ये देखील सामील होणार नाही असे शिखा यांनी स्पष्ट केले.



भाजप नेते आणि शिखा यांचे कौटुंबिक मित्र शुवेन्दु अधिकारी (Suvendu Adhikari)यांनी शिखा यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर त्या भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.


पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी झालेल्या चार टप्प्यातील मतदानांसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी 148 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये शिखा मित्रा यांच्यासह पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक झाली. दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात बुधवारी भाजप सीईसी सदस्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये 148 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.


पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधील 294 विधानसभेच्या जागांसाठी 8 टप्प्यात मतदान होईल. राज्यात 27 मार्च, 1 एप्रिल, 6 एप्रिल, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 22 एप्रिल,26 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 


तर निवडणुकीचा निकाल २ मे रोजी येईल. पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात 30-30 जागांसाठी, तिसर्‍या टप्प्यात 31 जागा, चौथ्या टप्प्यात 44 जागा, पाचव्या टप्प्यात 45 जागा, सहाव्या टप्प्यातील  43 जागा, सातव्या टप्प्यातील 36 जागांसाठी मतदान होणार आहे. आणि आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी मतदान होईल.