कोलकाता : पश्चिम बंगालचं नाव बदलण्याचा ठराव पास झाला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये हा ठराव पास करून घेण्यात आला. पश्चिम बंगालचं नाव बदलून बांगला करण्यात यावं, असा हा ठराव होता. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं पास केलेला हा ठराव आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हिरवा कंदील दिल्यानंतर पश्चिम बंगालचं नाव बदलून बांगला होईल. आता केंद्रातलं मोदी सरकार या नावाला हिरवा कंदील देतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.