West Bengal Bus Accident : भारतात रस्ते अपघाताच्या (Bus Accident) प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. कित्तेक लोकांचे रस्ते अपघातात मृत्यू होतात. त्यामुळे वाहन चालवताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. अशातच आता पश्चिम बंगालमधील (West Bengal) पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात भरघाव वेगाने येणारी बस (Bus Accident) अचानक उलटली. त्याचा व्हिडिओ सध्या (Video) व्हायरल होताना दिसतोय. (West Bengal Bus Accident full of passengers overturned CCTV Video went viral marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Bus Accident Video) दिसतंय की, बस वेगात येत आहे. बसच्या पुढं एक रुग्णवाहिका (Ambulance) जाताना दिसते. तर, काही लोक रोडवरून जाताना दिसत आहे. बस थोडी वेगात असल्याने बसचं नियंत्रण सुटलं. बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. यावेळी काही प्रवासी बसच्या छतावरही बसले होते. बस पलटी होताच ते थेट जमिनीवर पडले. त्याचा व्हिडिओ (CCTV Video) समोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.


या अपघातात तब्बल 40 ते 50 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना काटवा उपविभागीय रुग्णालयात दाखल (Admitted to Hospital) करण्यात आलं आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर (Critical condition) असल्याचं समजतंय.


पाहा Video - 



दरम्यान, अपघात पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय. बस उलटल्यानंतर () बसच्या टपावर बसलेले लोक दहा फूट लांब जाऊन पडले. तर काही जण बसच्या खाली सापडले. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. तर बसमधील अनेकांना मुक्कामार लागला आहे. तर काही प्रवाशांच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देण्यात आले.