नवी दिल्ली : देश सध्या कोरोनाच्या coronavirus संकटातून जात असतानाच आता एका राज्यात नागरिकांना दिलासा देणारी घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. हे राज्य आहे पश्चिम बंगाल. जिथं बांकुरा येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबतची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील वर्षी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ज्या धर्तीवर 2021 पर्यंत मोफत धान्य (तांदूळ) वाटपाची घोषणा करण्यात आली. 


डिसेंबर महिन्यापासून मोफत धान्य...


मुख्यमंत्री CM Mamta Banerjee ममता बॅनर्जी यांनी ही योजना 1 डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं. यादरम्यान, West Bengal मधील प्रत्येक प्रभागात दररोज म्हणजेच आठवड्यातील सातही दिवस दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. या नव्या संकल्पनेला 'डोर टू डोर सरकार' असं नाव देण्यात आलं आहे. 


जिथं नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठीचे प्रयत्न होणार आहेत. तसे आदेशच देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे या सेवेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सरकार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी प्रत्येत नागरिकाला देणार आहे. 


 


पश्चिम बंगालमध्ये असणाऱा बेरोजगारीचा मुद्दा, केंद्रासोबत असणारे मतभेद अशा मुद्द्यांवरही बॅनर्जी यांनी प्रकाशझोत टाकला.