पश्चिम बंगाल : देशाच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee Security Breach) यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी समोर आली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारी निवासस्थानात एक अज्ञात व्यक्ती घुसल्याची घटना घडलीय. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असताना ही घटना घडली कशी असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचसोबत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती ममता बॅनर्जी यांच्या सरकारी निवासस्थानात घुसला होता. हा अज्ञात व्यक्ती आज सकाळी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ झोपलेला आढळला होता. या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. 


दरम्यान कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा अत्यंत कडक असते. अशा परिस्थितीत कोणी सुरक्षा व्यवस्था तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आत जात असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्य़ा सुरक्षेत कडेकोट बंदोबस्त असताना देखील एक अज्ञात व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात कशी घुसली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


या घटनेतील आरोपी कोण आहे आणि तो कुठून आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.मात्र या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.